
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- दि.२९ आॅक्टोंबर शनिवारी कळकावाडी ता.कंधार येथे अध्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात सकाळी ९ ते १० या वेळेत रूद्राभिषेक होईल व १० ते १२ या वेळेत भजनाचा कार्यक्रम होईल, दुपारी १२ वाजता महर्षी वाल्मिकीच्या प्रतिमेचे पूजन व गुलाल उधळण्याचा कार्यक्रम होईल व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होईल, दुपारी १ ते ३ या वेळेस मान्यवरांच्या मनोगताचा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमात मुख्य व्याख्याते म्हणून प्रा.आनंदा बळीराम करणे हे उपस्थित राहणार आहेत.तसेच श्री प्रकाश उलगुलवाड(जि.प.सदस्य), श्री माधव पुरबा पुनवाड(कोळी महासंघ आ.नांदेड), श्री वामन लक्ष्मण श्रीमंगले(मुख्य सल्लागार), श्री बालाजी मदेवाड(मा.सरपंच बरबडा), श्री दिलीप नामदेव मदेवाड(तलाठी)हे उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी ५ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे व सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मिरवणूक निघेल तरी सर्व जनतेनी मोठ्या संख्येने हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती समस्त गावकरी मंडळी मौजे कळकावाडी ता.कंधार यांनी केली आहे.