
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:देगलूर शहरातील जुना बस स्थानक परिसरात चिखल झाल्याने प्रवासासह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या बस स्थानकावरून देगलूर व उदगीर मार्ग आणि कर्नाटक राज्यातील औराद बिदर याकडे भरपूर प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात बस स्थानक परिसरामध्ये अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी पाणी साचत आहे. जागो जागी पाण्याने खड्डे भरले आहे त्या मुळे येणारा जाणारा नागरिकांना नाहक त्रास होत आहे वेळोवेळी देगलूर मधील सामाजिक संघटनेने प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासनाला जागे करण्याचे काम करत आहेत पण मात्र प्रशासन झोपीचे सॉंग घेऊन याकडे दुर्लक्ष करत आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाने या विषयाकडे लक्ष घालून बस स्थानकातील खड्डे दुरुस्त करून बस स्थानकातील घाणीचे साम्राज्य हटवून देगलूर शहरातील एक सुसज्ज बस स्थानक दिसेल याप्रमाणे कार्य करावे असे देगलूर शहरातील नागरिकांमधून होत आहे यांचे .