
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे मौजे नळीवडगांव ता.भूम येथिल हनुमंत माणिक समिंदर यांचे राहते घराची पडझड झाल्यामुळे कुटुंबाला उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त कुटुंबास शासनाच्या वतीने मदत मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की ,मौजे नळीवडगांव ता. भूम येथिल रहिवाशी असणारे हनुमंत माणिक समिंदर यांचे मौजे वडगांव येथील राहते घर दिनांक २० गुरूवार २०२२ रोजी झालेल्या वादळीवाऱ्यासह अतिवृष्टी पावसामुळे त्यांचे राहते घर पडले असून ते उदवस्त झाले.त्यामुळे समिंदर कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली असून कुटुंब बेघर झाले आहे. यामूळे समिंदर कुटुंबीयास लवकरात लवकर आर्थिक, शासकीय मदत व घर बांधून देण्यात यावे. पिडित कुटुंबीयांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे. जर का शासकीय मदत मिळाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडणार असल्याने याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील.यावेळी निवेदनावर स्वाक्षरी वैभव गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष,रोहीत गायकवाड शहर अध्यक्ष,मुसा शेख तालुका अध्यक्ष,अक्की गायकवाड युवक तालुका अध्यक्ष, दीपक इजगज, सिद्धादेन सरवदे,जकीर शेख,चिराग गायकवाड,तसेच उपस्थित रोहीत चंदनशिवे आदी पदाधिकारी होते.