दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
आशा वर्कर यांचे कार्य कौतुकास्पद राहिले आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतांनाही ते आपले कर्तव्य उत्तमरित्या पार पाडत आहे. कोरोना काळात त्यांनी दिलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. एक लोकप्रतिनीधी आणि या ताईंचा भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहिल अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी आज व्यक्त केली.
बुधवारी भाऊबीज निमित्त आशा वर्कर यांनी कार्यालयात येऊन आमदार जोरगेवार यांना औक्षवंत करीत ओवाळणी करुन भाऊबीज साजरी केली. या वेळी आमदार जोरगेवार यांनीही भाऊ म्हणून त्यांना आर्शिवाद देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे म्हटले आहे.दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, आशा देशमुख, करणसिंह बैस, नकुल वासमवार यांच्यासह आशा वर्कर उपस्थिती होत्या.
समाजात आशा वर्कर यांचे विशेष स्थान आहे. शासनाचे काम त्या प्रमाणीकपणे करीत आहे. विशेषतः कोरोना काळात त्यांनी दिलेली धाडसी सेवा कधीही विसरली जाऊ शकणार नाही. घरची कामं उरकून त्यांना कामाच्या ठिकाणी पोहचावं लागतं. कधी लसीकरणाची ड्युटी तर कधी गावात जाऊन जनजागृती करण्याची मोठी जबाबदारी असते. त्या ती जबाबदारी उत्तम रित्या पार पाडत आहे. असे असतांनाही त्यांच्या वेतनासह ईतर अनेक अडचणी आहे. याची मला जाण व कल्पना आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. आज भाऊबीज निमित्त औक्षवंत करुन तुम्ही भाऊ बहिणीचे अतूट नाते जपले आहे. दरवर्षी न विसरता आपण रक्षाबंधन आणि भाऊबीज हा भाऊ बहिणीचा सण माझ्यासोबत साजरे करता. मी सुध्दा भाऊ म्हणुन सदैव तुमच्या पाठीशी ठाम पणे उभा राहील असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले .
