
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीच्या सदस्य पदी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या निवडीबद्दल केसराळी ता. बिलोली येथे जे. जे. रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.मधुकरराव गायकवाड यांच्या निवास्थानी सत्कार करण्यात आला.
केसराळी येथील शिक्षक संतोष मनधरणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल केसराळी ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच डाॅ. मधुकरराव गायकवाड,सरपंच राजू पाटील मंनधरणे , शंकरराव गायकवाड( मा सरपंच) दत्तात्रय माडे (मा. सरपंच) डाॅ. इनामदार आदि उपस्थित होते