
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुंबई- संभाजी गोसावी.
राज्यांत जगभरात रोड अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पावतात त्यामुळे रोड सेलटी अर्थात रस्ता सुरक्षा हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. याच विषयाच्या अनुषंगाने आता मुंबईतल्या रिक्षावाल्यांची तक्रार घेऊन महिला थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यांत या महिलांचा अपक्षक आहे तो म्हणजे रिक्षातला आरशावर बहुतेक पुरुष रिक्षा चालक ड्रायव्हर च्या समोर लावलेल्या रिअर हयु मिरच्या वापर प्रवासी महिलेकडे एक तक बघण्यासाठी करतात असा या महिलांचा आरोप आहे त्यामुळे त्यांचे लक्ष विचलिंत होते आणि अपघात होतात. रिक्षातील असे आरसे काढून टाकावेत अशी मागणी महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने केली आहे. रिक्षाच्या आतील जो आरसा बसवण्यांत आला आहे. त्याचा काही उपयोग नसतो कारण रिक्षा पाठीमागून संपूर्ण बंद असते या आरशाचा उपयोग फक्त पाठीमागे बसलेल्या महिलांना व किंवा मुलींना बघण्यासांठी केला जातो.असा आरोप आता स्वयंसेवी संस्थेने चांगलाच केला आहे. तसे पाहिले तर इतर वाहनांपेक्षा ऑटो रिक्षाला रिअर मिररची आवश्यकता असते. रिक्षाला दोन साईड लयु मिरर दिलेले असतात. त्याचा वापर करून ते सहजपणे रिक्षा चालू शकतात असे असताना ड्रायव्हर सीटवर आरशाची गरजच काय? असा सवाल आता चांगलाच उपस्थित होणे स्वाभाविक आहे. महिला वर्गांच्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे आता महिलांचे चांगलेच लक्ष लागले आहे.