
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी.
दोन महिन्यांपूर्वीच माण तालुक्यांतील दहिवडी पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पदभार हाती घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे तरुण आणि सिंघम अधिकारी म्हणून त्यांची पोलीस प्रशासनांमध्ये चांगलीच ओळख आहे. नुकताच त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यांचे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्याकडूंन पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या धडक कारवाईमुळे माण तालुक्यांतील अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून. बुधवारी सायंकाळी दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मलवडी या गावांमध्ये त्यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसमवेत गोपनीय माहितीच्या आधारे दहिवडी हद्दीतील मलवडी या गावांमध्ये मटका जुगार अड्ड्यांवर छापा टाकला. या कारवाईमध्ये तब्बल ३ लाख ३० हजार १६५ रुपये रकमेसह मोबाईल आणि गाड्यासहित असा मुद्देमाल हस्तगत करण्यांत दहिवडी पोलिसांना यश आले. यामध्ये एकूण नऊ जणांच्या विरोधांत दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यांत आला. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह दहिवडी पोलीस ठाण्यांतील आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या धडाकेबाज कारवाई बद्दल परिसरांतून त्यांचे चांगलेच कौतुक होत आहे.