
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोल्हापूर- संभाजी गोसावी. राज्यांत सध्या शिंदे सरकार स्थापनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मात्र सिलसिला अजूनही चालूच आहे. काही जिल्ह्यांतील कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांच्या आदला बदल करण्यात आल्या. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्तव्यादक्ष शिस्तप्रिय अशी त्यांची पोलीस खात्यांमध्ये चांगलीच ओळख असणाऱ्या जयश्री. डी देसाई यांची कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर नियुक्ती करण्यांत आली. देसाई या मुळच्या सातारा जिल्ह्यांतील असून सध्या त्या रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होत्या. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये त्यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी अंमलदार यांच्यासह अनेकांनी देसाई मॅडम यांची सदिंच्छा भेट घेवुन त्यांचे कौतुक करीत त्यांचे स्वागत केले. देसाई मॅडम यांचा रत्नागिरी जिल्ह्यासाठी कार्यकाळ अतिशय उत्कृंष्ट आणि पारदर्शकच राहिला. जिल्ह्यांमध्ये त्यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी गुन्ह्याची उकल करण्यांत तसेच सायबर क्राईम गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती मोहीमही त्यांनी चांगलीच हाती घेतली होती. याच त्यांच्या कामगिरीबद्दल अनेकांनी त्यांची सदिंच्छा भेट घेवुन कौतुक करीत पुष्पगुच्छ देत त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यांचे नूतन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील त्यांचे भव्य स्वागत केले. जयश्री देसाई यांनी कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.तर त्यांच्या रिक्त जागेवर रत्नागिरी जिल्ह्यांत अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून जयश्री गायकवाड यांची नियुक्ती करण्यांत आली आहे. यावेळी सातारा जिल्ह्यांचे लोकप्रिय प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी देसाई मॅडम यांचे सोशल मीडियावरुन अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.