
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा – संभाजी गोसावी
शहरांतील राजवाडा परिसरांत बुधवारी रात्री खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्या पोटात अज्ञांत व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या यामध्ये आप्पा मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण चांगलेच निर्माण होते. पोलिसांनी राजवाडा परिसरांत मोठा बंदोबस्त तैनात केला होता. हा वाद पूर्व. वैमनस्यांतून झाला असल्यांचे बोलले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील राजवाडा परिसरांमध्ये खासदार उदयनराजे समर्थक आप्पा मांढरे हे बोलत उभे राहिले होते .त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञांत व्यक्तीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या या गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहेत. या प्रकाराची माहिती शाहूपुरी व सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमी मांढरे यांना तातडीने खाजगी रुग्णालयांत दाखल केले. राजवाडा जवळ गोल बागेजवळ ही घटना घडली असून. तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. तसेच पोलिसांनी सातारा शहरांची नाकाबंदी सुद्धा केली होती.