
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी- आकाश माने
सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुडोस्पर्धेत 36 पदके प्राप्त करणाऱ्या विजेत्यांचा जालना शहर युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
रविवारी ( ता.13) युवा सेना शहर शाखेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर ,शहर प्रमुख बाला परदेशी, युवासेना विस्तारक भरत सांबरे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी शेजुळ, शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, माजी नगरसेवक विजय पवार, युवा नेते अश्विन आंबेकर ,युवा सेना तालुकाप्रमुख संदीप मगर, रामेश्वर कुरील ,भागवत भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भास्करराव आंबेकर यांनी
जिल्ह्यातील कुडो पटूंनी देश पातळीवर आपल्या खेळातून जिल्ह्याचे नाव उज्वल करत मिळवलेला बहुमान हा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयोजक
#अंकुश_पाचफुले यांनी महाराष्ट्राच्या संघात एकट्या जालना जिल्ह्यातील 36 कुडोपटूंनी मिळवलेली पदके नवीन खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याने त्यांचा गौरव व्हावा या हेतूने सत्कार सोहळा आयोजित केल्याचे पाचफुले यांनी सांगितले.
यावेळी प्रशिक्षक दत्ता पवार, अनिकेत भुतेकर, अभिषेक उदेवाल, धीरज गुप्ता, सुमित भवर ,गौरव आजगे, रोहित जैस्वाल, राजवीर चौधरी यांच्यासह विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पालक, पदाधिकारी व युवा सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
_________________