दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:शहरातील मोंढा भागातील तीन अडत दुकानांसह जुने बसस्थानक परिसरातील एक किराणा दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह ऐवज लंपास केल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली.
देगलूर शहरात ७ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी काही नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन व काही पाकिटे व मोबाईल लंपास केले। होते. याचा फटका दस्तुरखुद्द यात्रेचे समन्वयक तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाही बसला होता. या चोरीच्या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी पुन्हा १२ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास शहरात पुन्हा धुमाकूळ घातला.
शहरातील मोंढा मैदानावरील तीन अडत दुकानासह चोरट्यांनी जुन्या बसस्थानक परिसरातील एक किराणा दुकान फोडले. यामध्ये श्री माऊली ट्रेडिंग कंपनीमधून एक लाख रुपये, भानुशाली बारदान व्यापारी यांचे ३० हजार रुपये, मदिना ट्रेडिंग कंपनीतून २५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनीपळविली. तर जुन्या बसस्थानकावरील एका किराणा दुकानातून रोकड व इतर अन्य ऐवज लंपास केल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान एकाच दिवशी शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पळविली. तर जुन्या बसस्थानकावरील एका किराणा दुकानातून रोकड व इतर अन्य ऐवज लंपास केल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान एकाच दिवशी शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान याप्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. याप्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
