
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्यातील मौजे येलूर येथील सर्व योजनांचा लाभधारकांना मागील मार्च २०२२ पासून धान्य मिळत नाही.याचे कारण लाडका ता.कंधार येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडे पर्यायी व्यवस्था जोडली आहे.तेंव्हापासून पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत धान्य व नियमित मिळणारे धान्य कार्डधारकांना आठ महिन्यापासून मिळत नसून कार्डधारकांचे वाटपाचे अंगठे घेतले जातात आणि त्यांना धान्य वाटप केले जात नाही.त्यामुळे गोरगरीब जनतेची उपासमारीची वेळ आली आहे.शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.लाडका येथील पर्यायी व्यवस्था स्वस्त धान्य दुकानदार हरीनाम शिंदे यांना वारंवार धान्याची मागणी केली असता.ते म्हणतात तहसील कार्यालयांनी तुमचे धान्य रोखून धरले आहे.मी कांहीच करू शकत नाही.तुम्हाला काय करायचे आहे ते करा.माझ्याकडून तुम्हाला धान्य वाटप केले जावू शकत नाही.तेंव्हा उपोषणकर्ते कार्डधारकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब नांदेड, उपविभागीय अधिकारी साहेब कंधार, नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, आमदार तुषार राठोड साहेब या सर्व मान्यवरांनी येलूर येथे होत असलेल्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच पर्यायी व्यवस्था करुन आम्हाला धान्य वाटप जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण चालूच राहिल असे उपोषणकर्ते कार्डधारक सुभाष थोराजी शिंदे, बाबाराव नारायण शिंदे, ज्ञानेश्वर बजरंग शिंदे, अशोक लक्ष्मण शिंदे (ग्रा.पं सदस्य) महादा बाबुराव उंदरे (ग्राप.सदस्य) माधव थोराजी शिंदे, मारोती बापूराव शिंदे, हनमंत बापूराव शिंदे, ज्ञानेश्वर थोराजी शिंदे, धनाजी लक्ष्मण शिंदे, निवृत्ती जळबा ननुरे, उत्तम निवृत्ती ननुरे,राजेश थोराजी शिंदे, गंगाधर शिंदे हानंमत शिंदे अशोक पांडुरंग शिंदे,थोराजी बाबाराव शिंदे, आशाताईं बळीराम शिंदे, दशरथ रामजी शिंदे या सर्व कार्डधारकांनी आमच्या मागण्या मंजूर करून आम्हाला न्याय द्यावा असे आवाहन केले आहे.