दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे….उपप्राचार्य परशुराम येसलवाड .
=============================
श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर व नवीन कौठा
येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालकदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यापवेळी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड यांनी पंडित नेहरू यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुधीर कुरूडे,पर्यवेक्षक प्रा.माधव ब्याळे,पर्यवेक्षक शिवराज पवळे,कौठा शाखा इन्चार्ज प्रा.सय्यद जमिल,प्रा. स्वाती प्रा. कैलास पतंगे, प्रा. जयवंत यानभुरे, प्रा. ज्ञानेश्वर लुंगारे,प्रा. दीपक श्रीवास्तव,प्रा. संगीता स्वामी, विजयाताई कुरूडे, व्यंकट उपासे विद्यार्थी संसदेची अध्यक्षा कु. शिल्पा कोयालकर, नितीन राऊत कु.रेणुका शिंदे,कु. संजना बोईनाळे,कु. प्रिया कांबळे, करण रगडे, निखिल जाधव आदी उपस्थित होते.
