
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
शहरातील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाकडून विरभद्र यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिरणी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उत्कृष्टपणे महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे समाधान व्यक्त करीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी. अडकिणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . बी.एस.एफ.मध्ये महाविद्यालयाचा शिकारा येथील माजी विद्यार्थी शेळके सोमेश्वर किशनराव याची निवड झाल्यामुळे त्याचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले .
नरसी रोडवरील महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणातून शोभायात्रा निघून शहरातील मुख्य बाजारपेठेतून विरभद्र मंदिरात बँड पथकासह संस्थेचे संचालक श्रीकांत पाटील हंगरगेकर , सुभाषअप्पा शिवपुजे , रणजित पाटील हंगरगेकर , ओंकारअप्पा मठपती , मा.प्राचार्य शंकरराव बसापूरे , मा.प्राचार्य ज्ञानोबा वंजे , शिवराज पाटील हंगरगेकर , संजय गोंड , पांडूरंग चमकुरे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी , प्रा.सी.बी.साखरे , प्रा.डॉ. डी.के.आहेर , प्रा.डॉ. एम.के.राऊत , प्रा.डी.बी.साखरे , प्रा.जी.एम.वायफणकर , प्रा.बी.जी.पावडे , प्रा.एस.पी.अग्रवाल आणि इतर सर्व वरिष्ठ ,कनिष्ठ व व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते