
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
आजही जिल्हा परिषद शाळा यशाच्या शिखरावर जाऊन दाखवत आहेत ते फक्त तेथील जिल्हा परिषद शिक्षकांच्या परिश्रमातून, ज्याने जिल्हा परिषद शाळा काय टाकत आहेत असे म्हणतात त्यांना हा यशस्वी यशाचा चपराकच म्हणावे लागेल.ह्या अशा ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा सुरळीत यश संपादन करत आहेत अशाच प्रकारे
मुखेड तालुक्यातील होनवडज येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे एकूण १३ पैकी १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे.श्रीनिवास जाधव , लक्ष्मीकांत गोगूरवार ,सम्यक जोंधळे , महेश माकणे, ओंकार जाधव ,सोमेश अटकळे ,समुध्दी जाधव , श्रध्दा जाधव , संविधान कांबळे , नरेंद्र पांडलवाड , कार्तिकी गुजलवार , संजिवनी पांडलवाड हे विद्यार्थी पैकी 6 विद्यार्थी 200 पेक्षा जास्त गुण घेतले आहेत.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मनोहर जाधव, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी व्यंकट माकणे, केंद्र प्रमुख कुसूमकर , पत्रकार भास्कर पवार सह सर्व ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना सहशिक्षक कराळे बी. जी, शेख शफी, वडजे एम. व्ही., येरबले एम. बी., सय्यद एस. एम., करकेलवार एस. आर, श्रीमती घाटे डी. पी., शेटकार एम. एस. देहेडकर एम. व्ही.यांनी मार्गदर्शन केले.