
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
येथील गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात पं.जवाहरलाल नेहरू व क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर व वक्त्या अर्चना सुरशेटवार या होत्या. मान्यवरांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व चिमुकल्यांसह मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.यानंतर वक्त्या सौ.सुरशेटवार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती हे बालदिन म्हणून का साजरे केले जाते याविषयीची माहिती तसेच बालदिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश देशात बालसंगोपन, बालहक्क व बालशिक्षण याविषयी जागरूकता पसरवणे असे विद्यार्थ्यांना सांगितले.
यानंतर अध्यक्ष समारोपात देगावकर दमन यांनी वस्ताद लहुजी साळवे या क्रांतिवीरांची माहिती मुलांना दिली व दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेळके भानुदास यांनी केले व खेळ या उपक्रमात सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले.