दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम : मॉर्निग क्रिकेट क्लबच्या वतीने भूम येथे आयोजित खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये ६१ हजार ९५५ रुपयाचे प्रथम पारितोषिक तुळजापूर संघाने पटकावले. ४१ हजार ९५५ रुपयाचे द्वितीय पारितोषिक कोरफळे संघ, ३१ हजार ९५५ रुपयाचे तृतीय पारितोषिक चारे ( ता. बार्शी) येथील संघाने पटकावला. उत्तेजनार्थ २१ हजार ९५५ रुपयाचे पारितोषिक मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या संघास मिळाले.यावेळी आलमप्रभू शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे, रामभाऊ बागडे संदीप नाईकवाडी, किरण गाढवे, राहुल गाढवे, अॅड. अमित जाधव, पै. धनंजय गाढवे यांच्यासह विजेत्या संघातील खेळाडू, क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
