
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची केली विनंती
हाळदा :- कंधार तालुक्यातील हाळदा येथील शेतकरी शहाजी बाबाराव पाटील शिंदे यांच्या शेतात विहीर असून महावितरण कंपनीचे कनेक्शन आहे.दरवर्षी नियमित विज बिल पुर्णपणे भरणा केला असून जवळपास एक महिन्यापासून त्यांचा शेतातील विजपुरवठा बंद आहे.का बंद आहे हे बघायला लाईनमन तयार नाही.हाळदा येथील लाईनमन साहेबांना वारंवार विनंती करुन सुद्धा विज पुरवठा चालू करीत नाहीत.म्हणून त्यांनी उपअभियंता साहेबांना चार पाच वेळेस माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती केली.पेरूची बाग वाळून जाते आहे, त्यामुळे विजपुरवठा चालू करून द्या.परंतू विज पुरवठा सुरळीत चालू झाला नाही.परीणामी एक हेक्टर क्षेत्रावरील पेरूची बाग करपून वाळून नुकसान झाले आहे.शेतकरी असल्याने एवढे मोठे नुकसान सहन करणे शक्य नाही.कारण त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे दुसरे साधन नाही.सर्व व्यवहार शेतीवर अवलंबून आहे.शेतातील पेरूची बाग कशी करपून वाळून गेली याची चौकशी करून दोषीं अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून.झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी मा.मुख्यमंत्री साहेब,मा.ऊर्जामंत्री साहेब,मा.जिल्हाधिकारी साहेब,मा.मुख्य अभियंता साहेब यांच्याकडे केली आहे.महावितरणच्या निष्काळजीपणामुळे किंवा न्याय न मिळाल्याने एका शेतकऱ्याचा जीव जाणार नाही याची दक्षता घ्यावी न्याय नाही मिळाल्यास होणार्या परिणामास महावितरण सर्वस्वी जबाबदार असेल असे शेतकरी शहाजी पाटील शिंदे यांनी दैनिक चालू वार्ताच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.उपअभियंता साहेबांना निवेदन देऊन कळविण्यात आले आहे.प्रशासनाने व शासनाने झालेले नुकसान भरपाई देऊन विज पुरवठा सुरळीत चालू करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे.