
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:परभन्ना फाउंडेशन पुणे यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा कार्य कृतज्ञता पुरस्कार दिला जातो. पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी रामचंद्र भंडरवार यांची निवड करण्यात आली असून त्यांना पुणे येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
परमन्ना फाउंडेशन पुणे यांच्या वतीने दरवर्षी पर्यटन, पर्यावरण, पत्रकारिता, पोलीस प्रशासन,आरोग्य सेवा, कृषी क्षेत्र, उद्योग जगत, सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कृत केले जाते. २०२१-२२ च्या सेवा कार्य कृतज्ञता पुरस्कारासाठी विविध नावांची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कारासाठी देगलूर येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी रामचंद्र भंडरवार यांची निवड करण्यात आली आहे. रामचंद्र भंडरवार हे गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत त्यांनी गेल्या २५ वर्षापासून त्यांनी देशोन्नती
सारख्या आघाडीच्या वर्तमानपत्रातून विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, ऐतिहासिक क्षेत्रातील घडामोडी अत्यंत समर्थपणे मांडल्या आहेत. ते समाजातील वंचित, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन परमन्ना फाउंडेशनने त्यांची पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांना पुणे येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.