
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका आवाळपूर
आवाळपूरच्या अल्ट्राॅटेक सिमेंट कंपनीच्या वसाहतीत गेल्या एक आठवड्यापासून नित्य कामगारांना वाघाचे दर्शन होत असल्याचे बोलल्या जात आहे .दरम्यान येथील कार्यरत कर्मचारी अगदी सुरक्षित असून या भागातील शेतकरीवर्ग मात्र भितीयुक्त वातावरणात आपले दिवस काढीत आहेत . या परिसरात दिवस रात्र फिरणा-या वाघाचा बंदोबस्त करण्यास वनविभागाला अद्याप यश प्राप्त झाले नसल्याचे समजते . गेल्या दोन वर्षांपूर्वी ह्या सिमेंट उद्मोगात तीनदा वाघ आला होता तर दोनदा या वाघोबाला वनविभागाने पकडले होते. आजच्या घडीला हा वाघ गेल्या एक आठवड्यापासून येथेच आहे .परंतु वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष लक्ष वेधले नाही असे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे .
कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील बहुतांश गावात सध्या कापूस वेचणी व गहू, हरबरा पेरणीचे कामे शेतात धडाक्यात सुरू आहे . त्यामुळे ग्रामीण परिसरातील महिलावर्ग आपल्या शेतात जात आहेत, पण आता शेतकऱ्यांच्या बांधावर वाघ येत असल्याची चर्चा आहे.सध्या हा वाघ विरूर पैनगंगा वेकोली परिसरात आल्याचे परत एकदा ऐकिवात आहे .हा वाघ आवाळपूरच्या अल्ट्राॅटेक सिमेंट वसाहतीत आल्याचे कामगारांना प्रत्यक्ष दिसले आहे . त्यामुळे आता त्यांचेत ही भिती निर्माण झाली आहे . शेतकऱ्यांनी शेतातील कामे करतांना सावध राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे. येथील वनविभाग आणि ग्रामपंचायतीने गावपातळीवर निदान एखादी दवंडी देण्याची आवश्यकता आहे . आता तर या वाघाच्या दहशतीमुळे शेतात जायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणून बकऱ्या गाय, म्हशी आणि बैल पाळत असतात . त्यांना चराईसाठी शेत शिवारात नित्य न्यावे लागत आहे . कास्तकारांना आपला जीव मुठीत घेऊन हे काम करावे लागत आहे. आजच्या घडीला कोरपना तालुक्यातील विरूर गाडेगाव आणि आवाळपूरच्या परिसरात या वाघाची भीती निमार्ण झाली .तदवतंच शेतीवरुन घरचा व्यक्ती कधी घरी परत येतो याची त्यांचे कुटुंब आतुरतेने वाट बघत असतात . वनविभागाने आता या कडे विशेष लक्ष पुरविणे आवश्यक व तेव्हढेच गरजेचे झाले आहे .