
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे हे परभणी येथील कार्यक्रम जालनाकडे जात असताना मंठा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे छत्रपती राजे संभाजी चौकात जंगी स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंकुशराव अवचार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, तालुकाप्रमुख अजय अवचार,माजी सभापती संतोष वरकड,परतुर तालुका प्रमुख सुदर्शन सोळंके,श्रीरंगराव खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गोंडगे, पंचायत समिती सदस्य मधुकर काकडे, बाबाराव राठोड, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप बोराडे, माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, जे के कुरेशी पप्पू दायमा यांची उपस्थिती होती. यावेळी ना. अंबादास दानवे यांनी तालुकाप्रमुख अजय अवचार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी डॉक्टरचा असोसिएशन वकील असोसिएशन व पदाधिकाऱ्यांचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे.बोराडे बोलताना म्हणाले की, ना.दानवे खमके नेतृत्व राज्याला मिळाले, शिवसेनेत त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला सत्ताधाऱ्यांना नामोहरम करणारे नेतृत्व त्यांच्या रूपाने मिळाले असे जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक, शिवसेनेचे विभाग प्रमुख, उपविभागप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.