
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारने धनदांडग्यांचा विचार करून पोल्यूशन जीआर मध्ये जो बदल केला आहे, तो वीटभट्टी कामगारांच्या उपजीवीकेला हानीकारक ठरणारा आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सुमारे २० हजार वीटभट्टी कामगार उपाशीपोटी राहिला जाणार आहे, त्यांच्यावर विसंबून सर्व परिवाराची वाताहात होणार आहे अशी टीका करीत माजी आमदार विजय गव्हाणे यांनी त्या पोल्यूशन जीआर मध्ये तात्काळ बदल करावेत अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या हा व्यवसाय बंद असला तरी लवकरच तो सुरु केला जाईल असे सांगून राज्यात लाखोंच्या संख्येने वीटभट्टी कामगार कार्यरत असल्याचे ते म्हणाले. जमिनीच्या उत्खननासाठी जी रॉयल्टी भरुन द्यावी लागत होती, त्यात बदल करण्यात आला आहे, जे धनदांडग्यांच्या फायद्याचे ठरले जात आहेत. राज्य सरकारने धनदांडग्यांचाच फायदा ध्यानी घेऊन पोल्यूशन जीआर मध्ये जो बदल केला आहे, त्यामुळे गोरं गरीब, कष्टकरी वीटभट्टी कामगारांची उपजिविका धोक्यात आली आहे. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. इतकेच नाही तर त्यांच्यावर अवलंबून सर्व परिवारांनाही उपासमारीचा धोका पत्करावा लागत आहे. तळहातावर पोट असणाऱ्या व अहोरात्र काबाडकष्ट करुन जीवन जगू पहाणाऱ्या या सर्व वीटभट्टी कामगारांना जीवनदान देण्यासाठी शासनाने पोल्यूशन जीआर मध्ये तात्काळ बदल करावा यासंबंधीचे निवेदन देऊन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे तशी शिफारस महाराष्ट्र शासनाकडे केली जावी अशी मागणी केल्याचे सांगितले. ते याप्रकरणी लवकरच मुंबईत पोल्यूशन बोर्डाचे एमडी श्री. दराडे यांची भेट घेणार आहेत असेही ते म्हणाले.