
दैनिक चालु वार्ता औरगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
मध्य रेल्वे विभागाने छत्रपती महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण दरम्यान लाइन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘ब्लॉक’अंतर्गत सीएसएमटी ते मस्जीद रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळाचे काम केले जाणार आहे. यामुळे १९, २० आणि २१ नोव्हेंबर मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम राहणार आहे. नंदीग्राम, जनशताब्दी, देवगिरी आणि राज्यराणी एक्सप्रेसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामुळे याचा फटका मराठवाड्याच्या जनतेला सोसावा लागणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल लाईनच्या या मुख्य लाईनवर सदरील रेल्वे रूळाचे काम तसेच इलेक्ट्रीकल काम केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मुख्य लाईनचा उपयोग मुंबईतून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेसाठी करण्यात येत असतो. या रेल्वे लाईनच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. या कामामुळे खालील रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम होणार आहे.रेल्वे क्रमांक ११४०२ ही आदिलाबाद ते मुंबई जाणारी रेल्वे १९ नोव्हेंबर रोजी दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दरम्यान अंशत: रद्द करण्यात आलेली आहे. ही रेल्वे आदिलाबाद ते दादर दरम्यान धावणार आहे.