
दैनिक चालू वार्ता मंठा प्रतिनीधी -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान झाले. शेतातील सोयाबीन,तुवर,कापूस,
आदी पिकांचे खूप मोठे नुकसान झाल्यामुळे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांची
परिस्थिती दैनिय झाली आहे.त्यातून स्वतःला सावरून मोठया आशेने रब्बीची पेरणी केली
आता रब्बीच्या पिकाला पाण्याची गरज असल्याने वीज पुरवठा नियमित सुरू ठेवावा अशा आशयाची मागणी मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या दोन -तीन साला पासून शेतकरी आर्थिक मानसिक त्रासाने विवंचनेत जगत आहे. दरवर्षी जून महिन्याला पेरणीला यावर्षी चांगले उत्पन्न होईल या आशेने यावर्षी तरी सावकाराचे देणे होईल अशी आशा उशिरा घेऊन शेतकरी पेरणी करतात परंतु नेहमीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत करत बळीराजा हतबल झाला आहे. यावर्षी पावसाच्या कहराने बळीराजा त्रस्त झाला, तब्बल एक दीड महिना अति पाऊस झाला, नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले व सर्व काही वाहून गेलं,आसमानी संकटात शेतकऱ्यांना नेस्तनाबूत केले.