
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील संगणक परीचालक संघटनेच्या अध्यक्षपदी श्री गोविंद भानूदास गर्जे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच उपाध्यक्षपदी श्री.प्रकाश बाबुराव डोळेवार यांचीही दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आणि सचिवपदी श्री.गजानन पांडुरंग जाधव यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी कंधार तालुक्याचे बि.एम.श्री.निळकंठ करेवाड साहेब यांची उपस्थिती होती.तसेच कंधार तालुक्यातील सर्व संगणक परीचालक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या झालेल्या निवडीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांना दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून दिलेले आहे.सर्व पदाधिकारी यांनी व करेवाड साहेबांनी नवनियुक्त कार्यकारिणीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.