
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : येथील स्व. ॲड. प्रताप बांगर विचार मंच द्वारा आयोजित क्रिकेट स्पर्धेत तुळशी क्रिकेट क्लबने आमदार गौरव चषक पटकावून आपल्या शौर्यात मानाचा तुरा रोवला आहे.
परभणी येथील स्टेडियम संकुलातील क्रिडांगणावर आयोजित क्रिकेट स्पर्धांनी संपूर्ण क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. अटी तुटीच्या या लढाईत तुळशी क्रिकेट क्लबने विरोधी संघावर चुरशीची चढाई करत आमदार गौरव चषक पटकावला तो डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. विजेत्या संघाला राज्याचे माजी मंत्री तथा मुंबईहून शिवसेनेचे परभणी जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते तो चषक प्रदान करण्यात आला.
यावेळी परभणीचे शिवसेना खासदार संजयजी जाधव यांची तर विशेष अतिथी म्हणून स्थानिक शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांची उपस्थिती लाभली होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी नगरसेवक अतुल सरोदे यांच्यासह जिल्हास्तरावरील सेनेचे अनेक पदाधिकारी, विविध मान्यवर, कार्यकर्ते, क्रीडा रसिक, अन्य संघांचे खेळाडू आदींची भरगच्च अशी गर्दी होती.
या स्पर्धेचे आयोजन पीडीसी क्रिकेट क्लबद्वारा करण्यात आले होते. परभणीच्या क्रीडा रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यामुळे या स्पर्धा अत्यंत मनोरंजक अशा ठरल्या गेल्या.