दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:साडूच्या मुलानेच साथीदाराच्या मदतीने घरातील डब्यात ठेवलेले २ लाख १० हजार रुपये लंपास केल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली. ही घटना देगलूर शहरातील देशपांडे गल्लीत घडली. या प्रकरणी १५ रोजी देगलूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील देशपांडे गल्लीत किराणा व्यापारी माधव गादगे राहतात. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी गादगे यांच्या घराचे कुलूप तोडून डब्यात ठेवलं २लाख १० हजार रुपये पळविले. गादगे यांनी घरी चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गादगे यांचाच साडूचा मुलगा आणि त्याच्या एका साथीदाराने ही चोरी केल्याची बाब पुढे आली.
या प्रकरणी गादगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुरनं ५१२/२२ कलम ४५७, ३८६, ३४ दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक सोहम माछरे। यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक श्रीकांत मोरे पुढील तपास करीत आहेत.
