
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील होतकरु व सुशिक्षित तरुण-तरुणी, पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थी, निराधार, विधवा व परित्यक्त्या महिलांसाठी विविध योजना राबविण्याचे महत्प्रयासी सेवाकार्य हाती घेतले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची चर्चा परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु असून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही पूरती दखल घेतली आहे. नागरी सोयी-सुविधां बरोबरच सर्व सामान्यांचे उत्थान व रोजगारांना भरीव चालना देणारे विकासाचे महामेरु म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पक्षातर्फे मुंबईहून नियुक्त संपर्क प्रमुख तथा माजी मंत्री, आमदार रवींद्र वायकर यांनीही नुकताच त्यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
परभणी येथील स्थानिक शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी मागील वर्षभरापासून जसा नागरी विकास कामांवर जोर दिला आहे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक पूण्यकर्माबरोबरच वेगवेगळ्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाव्यात यावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या महिलांचे उदात्तीकरण व्हावे, सक्षमीकरण केले जावे, यासाठीची संकल्पना आखून संबंधित महिलांच्या उत्थानासाठीचे स्वप्न आ.पाटील यांनी उराशी बाळगले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद असेच म्हणावे लागेल.
मॉंसाहेब स्व.मीनाताई ठाकरे विधवा व परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजनेअंतर्गत अशा महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्याचे काम आ. राहूल पाटील यांनी जोमाने सुरु केले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सामाजिक विज्ञान महाविद्यालय आणि स्व. कमलताई जामकर महाविद्यालयात मशीनच्या शिलाई कामाचे प्रशिक्षण विशेष प्रशिक्षकांडून दिले जात असून ते प्रगती पथावर आहे. या सर्व प्रशिक्षणार्थी महिलांपैकी शीलाई मशीनच्या शिवण कामाचे प्रशिक्षण ज्यांचे ज्यांचे पूर्ण झाले आहे, अशांना शीलाई मशीनचे वितरण अगदी मोफत सुरु आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच स्व. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते सदर महिलांना वीरांनी मशीन प्रदान करण्यात आल्या. त्यावेळी सन्माननीय वायकर यांनी वरील प्रमाणे उद्गार काढून आ. पाटील यांचे कौतुक तर केलेच आहे शिवाय हाच आदर्श अन्य लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यावा असेही सूचक वक्तव्य केले.
तद्वतच याप्रसंगी जिल्ह्याचे शिवसेना खासदार संजय जी जाधव, जिल्हा प्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सखुबाई लटपटे, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.