
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-भारत देशाचे पहिले मिसाइल मॅन म्हणून ओळख असलेले, देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे, ब्रिटिशांना सळो कि पळो करणारे महामानव हजरत टिपु सुलतान यांची जयंती भुम येथे शहीद हजरत टिपू सुलतान एकता ग्रुप व ऐ जे ग्रुप यांच्या वतीने साजरी करण्यात येत आहे.
हजरत टिपु सुलतान यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय भुम येथे फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला व महात्मा गांधी उर्दू हायस्कुल भुम येथे गरजूवंत विद्यार्थ्यांना वही, पुस्तक, पेन वाटप करण्यात आले. तसेच दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगर परिषद भुम समोर मान्यवर यांचा सत्कार समारोह संपन्न होणार असुन संध्याकाळी ५ वाजता भव्य अशी मिरवणुक निघणार असल्याचे कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
याप्रसंगी कमिटी अध्यक्ष आख्तर जमादार, आसिफ भाई जमादार समाजसेवक, अज्जु जमादार, आलीम शेख, पैलवान आफताब जमादार, खदीर शेख,इम्रान शेख, सलमान पठान, सोहेल मोमीन, अमन जमादार, पैलवान आकलेस जमादार, दानिश शेख,साहील शेख, अरबाज शेख, हैदरअली जमादार आदी उपस्थित होते.