दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा:- संभाजी गोसावी
कराड तालुक्यांतील उंब्रजमध्ये महिन्यापूर्वी एटीएम फोडण्यांचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. या दोघांना नागठाणेतील स्मशानभूमीजवळून ताब्यांत घेतले. सातारा जिल्ह्यांत एटीएम मधून पैसे चोरीचे गुन्हे घडले असुन हे गुन्हे उघडकीस आणण्यांच्या सूचना माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला असे आदेश जारी केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर साहेब व संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक तयार करुन या पथकांला एटीएम बाबतचे गुन्हे उघडकीस आणण्यांत बाबत सूचना करण्यात आल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे हे पथक शोध घेत होते असे असतानाच शनिवारी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदाराकडूंन उंब्रज मधील एटीएम फोडण्यांचा प्रयत्न करणारे दोघेजण नाकतांच्या स्मशानभूमी जवळ दुचाकी (एम एच ११ डी.सी ०७३३) घेऊन थांबल्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहितीच्या आधारे गेले असता नागठाणे येथे दोघेजण आढळून आले. त्यावेळी त्या दोघांना ताब्यांत घेण्यांत आले. (गितेश नावडकर वय २६ रा. पाडळी ता. सातारा आणि राम उर्फ दयामुन्ना कोळी वय २१ रा. मारुती मंदिराजवळ राधिका चौक सातारा मूळ रा. तळीकोटी कन्नूर जि. विजयपूर कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केल्यावर महिन्याभरांपूर्वी उंब्रजमध्ये एटीएम फोडण्यांचा प्रयत्न केल्यांचे त्यांनी यावेळी पोलिसांना कबुली दिली. तर त्यांच्याकडूंन गुन्ह्यांत वापरलेली दीड लाख रुपये किमतीची दुचाकीही हस्तगत करण्यांत आली. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर,उत्तम दाबडे, तानाजी माने,अजित करणे प्रवीण,कांबळे प्रवीण पवार,मुनीर मुल्ला आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.
