
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- तालुक्यासह शहरातील १३ एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह साहिल कॉम्प्लेक्स येथे विकासरत्न माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.संयोगिताताई गाढवे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तालुक्यासह ग्रामीण भागातील १३ एमबीबीएस डिग्री प्राप्त करणार आहेत याचे खूप कौतुक व अभिमान आहे. यासाठी वैद्यकीय डिग्री प्राप्त झाल्यानंतर एक असे सुसज्य भव्य हॉस्पिटल उभा करून भूमिपुत्रांनी भूम करांच्या वैद्यकीय सेवा करावी अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्यासह उपनगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी व्यक्त केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी विद्यार्थी पालक, विकासरत्न संजय गाढवे प्रतिष्ठान मित्र मंडळ, नगरसेवक संदिप मोटे, मेहराजबी सय्यद, सुनिल थोरात, चांगदेव शेंडगे, किरण जाधव, बबलू बागवान, वस्ताद जमादार, विष्णू शिंदे , पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.