
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
जन सुनावणीत सी आर आय कंपनीचे अधिकारी अनुपस्थित
महावितरण कडे किती पंप चालू किती बंद याचा डाटा उपलब्ध नाही
चंद्रपूर
चंद्रपूर सामान्य शेतकऱ्यांना शेतात वीज पोहचावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील 300 शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये बुडाले. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम् आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला होता.
विद्युत वितरण कंपनीने सीआरआय कंपनीला शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्याचे काम दिले. एका शेतकऱ्यामागे विद्युत वितरण कंपनीने सी आर आय कंपनीला पाच एचपी साठी अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये सरकार ने दिले. कंपनीकडे दुरुस्ती देखभाल करण्यासाठी पाच वर्षाचा करार होता. सीआरआय कंपनीने विवेक वर्मा या कंत्राट दाराकडे इन्स्टॉलेशनचे काम दिले. 2019 पासून ते काम करीत होते. विद्युत वितरण कंपनीच्या देखरेखित हे काम करायचे होते पण विद्युत वितरण कंपनीच्या कमिशनखोरीमुळे शेतकऱ्यांना सर्व इन्स्ट्रुमेंट निकृष्ट दर्जाचे व बोगस लावल्या गेले.
विशेष म्हणजे सोलर पम्प घेतलेल्या शेतकऱ्यांना दहा वर्षापर्यंत विद्युत पुरवठा मिळणार नाही असा तुघलकी नियम लावण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली.
चंद्रपूर तथा गडचिरोली जिल्ह्यात एकूण 511 पंप लावण्यात आले. फक्त पाच टक्के लोकांचे पंप सुरू असून, बाकी सर्व पंप बंद आहेत असे आम आदमी पार्टीच्या चौकशीत आढळले.
प्रसार माध्यम तसेच सोशल मीडियावरील ही बातमी जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे महावितरण कंपणीने तात्काळ याची दखल घेत बाबुपेठ येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात आज दिनांक 24/ 11/ 2022 ला 11 वाजता जनसुनवाई तसेच चर्चा करण्याकरता ची मीटिंग आयोजित करण्यात आली. ही मीटिंग मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ चंद्रपूर चे श्री सुनील देशपांडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली या मिटींगला महावितरण चे सर्व विभागाचे अधीक्षक अभियंता उपस्थित होते .तसेच या मिटींगला सी आर आय कंपनीचे प्रतिनिधी श्री जगताप व श्री. थोरात यांना संपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याची सूचना देण्यात येऊन सुद्धा हेतू पुरस्कर अनुपस्थित राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील 312 शेतकऱ्यांचे विविध प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही. सीआरआय कंपनीचा एक नवखा अधिकारी उपस्थित झाला. वरील विषयात त्याला कसलेही ज्ञान नव्हते आकडेवारी नव्हती अशा व्यक्तींना उपस्थित करण्यात आले. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा पारा चढला व जोपर्यंत सी आर आय कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार नाही. तोपर्यंत मीटिंग होणार नाही. अशी भूमिका घेतली त्यानंतर मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जगताप आणि थोरात यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून उद्धटपणाची भाषा करण्यात आली. यावरून सी आर आय चे अधिकारी महावितरण च्या अधिकारी सोबत कसे उद्धटपणे वागतात याची प्रचिती आली. जर महावितरण सोबत अशा प्रकारे भाषा वापरत असेल तर गरीब सामान्य शेतकऱ्यांसोबत कसे बोलत असेल असा प्रश्न सर्व शेतकऱ्याकडून उपस्थित करण्यात आला. यावर आम आदमी पार्टीने शेतकऱ्यांच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या.
(1) सी आर आय कंपनीने महावितरण तसेच शेतकऱ्या सोबत फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावरती तात्काळ एफ आय आर करण्यात यावी .
(2) जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पंप खराब असल्यामुळे सिआरआय ने पैसे तात्काळ परत करावे.
(3) ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्यांना तात्काळ महावितरण कडून वीज पुरवठा देण्यात यावा.
(4) मागील चार वर्षात पंपाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत न केल्यामुळे जे आर्थीक नुकसान शेतकऱ्याचे झाले त्याची तात्काळ भरपाई करण्यात यावी.
(5) सीआरआय कंपणी ने ट्रान्सपोर्ट तसेच स्ट्रक्चर उभे करन्याच्या नावावर जो अतिरिक्त भुर्दंड जो शेतकऱ्यावर बसवण्यात आला तो तात्काळ परत करण्यात यावा.
वरील सर्व मागण्या दिनांक 5 डिसेंबर पर्यंत पूर्ण कराव्या अन्यथा आम आदमी पार्टीला तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आप यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार शहर सचिव राजू कूड़े,महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे,अश्रफ सय्यद,योगेश गोखरे,योगेश मुरेकर, सुनिल सदभय्ये,सुधीर पाटील, अजय बाथव, मधुकरराव साखरकर पवन प्रसाद इत्यादि सोबत शेतकरी दत्तू उरकुड़े,शकर गाडगे,विजय चिकटे,सुरेश मुसले,सुरेश कष्टी,पीयूष करलुके,जीवन ठेंगने,
रामराव संभा वासेकर, दिपक लक्ष्मणराव बेरर्षेट्टीवर, अनिल देविदास चिडे, प्रशांत ईश्वर उराडे तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते