
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
तालुक्यातील पिंपळगाव ढगे येथील प्रगतशील शेतकरी श्री.नागनाथ माधवराव लालवंडे यांच्या शेतातील रासी कंपनीचे RCH -797 या कपाशीच्या वाणाचा पिक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला..
यावेळी सदरील कंपनीचे मार्गदर्शक श्री.रमेश शिरसाठ,उमेश गोंड, व ज्ञानेश्वर महाजन यांनी शेतकऱ्यांना रासी कंपनीच्या RCH -797 या वाणाची माहिती सांगून सविस्तर चर्चा केली..
सदरील कार्यक्रमास गावातील प्रगतशील शेतकरी श्री.नागनाथ लालवंडे, सूर्यकांत लालवंडे, भाई किशनराव पा.ढगे वसंत पा.ढगे,शिवराज पा.ढगे,केशव लालवंडे,शिवसंभा लालवंडे,गोपाळ पा. कौंसल्ये,भीमराव बावनपल्ले, पत्रकार विजय पा.ढगे याबरोबरच कंपनीचे इतर कर्मचारी व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.