
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतीनीधी -प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरातील विविध उपक्रमाधिष्ठीत व विद्यार्थी केंद्रित आणि गुणवत्तेत अव्वल असलेले श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड मध्ये महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार तसेच शाळा तथा कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. सुधीर भाऊ कुरुडे व उप प्राचार्य मा. परशुराम येसलवाड तसेच शालेय समिती सदस्य माननीय सूर्यकांत कावळे व एम.पी.कुरुडे यांच्या पूर्व सूचनेनुसार पर्यवेक्षक माधव ब्याळे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या गीताने झाली आणि पर्यवेक्षक माधव ब्याळे व ज्येष्ठ प्रा. परीक्षा विभाग प्रमुख सहाय्यक वसंतराव राठोड , प्रा.सय्यद जमील यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत , क्षत्रिय कुलावंतस , बहुजन प्रतिपालक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आदर्श विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाच्या प्रा.सौ दिपाली जामकर यांनी भारतीय संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मिती मधील कार्य या विषयावर आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले तसेच इतिहास विभागाचे प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांनी ” *भारतीय संविधान उद्देशीकेचे वाचन* ” अतिशय सुंदर केले.
याप्रसंगी 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी प्रा.आकनगिरे लक्ष्मण , प्रा.अमर दहीवडे , प्रा.मोरेश्वर निलेश , प्रा.विक्रम लुंगारे , प्रा.कपील सोनकांबळे , प्रा.सौ.रुपाली कळसकर , प्रा.सौ.वैशाली दुलेवाड , प्रा.प्रतिभा जाधव , प्रा.शेख रेश्मा , प्रा.नवघरे रत्नमाला , प्रा.स्वामी संगिता , प्रा.कोंडेकर तेजस्विनी , प्रा.श्रीवास्तव दिपक , प्रा.लुंगारे ज्ञानेश्वर , प्रा.देशमुख शिवशंकर , प्रा.दिग्रसकर योगेश , प्रा. गोविंद मोरे , विद्यार्थी प्रतिनिधी शिल्पा कोयालकर , श्रीनिवास शेजुळे , कु.सुजाता बोकारे इत्यादी सह कला ,वाणिज्य व विज्ञान शाखेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय संविधान दिनाचे व 26/ 11 मध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास पतंगे व प्रा.रूपाली कळसकर यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन पद्धतीने केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पतंगे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता व राष्ट्रगीताने झाली.