
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर-
आनंददायी, नाविन्यपूर्ण व कृतीशील शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या विश्व पब्लिक स्कूल, देगलूर येथे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ मा. एच.एस. खंडागळे, पुणे येथील ज्येष्ठ उद्योजक मा. शिवकुमारजी आग्रे, निवृत्त ग्रामसेवक विरबसप्पा आग्रे, संविधान जागर समितीचे संजय कांबळे, शेतकरी चळवळीतील साथी सुर्यकांत देशमुख, देगलूर तहसील कार्यालयातील कोषागार लिपीक लिंगानंद भुरे, पालक शिवराज कोळनुरे, धोंडूसावकार येसगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिन सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी खंडागळे सर, शिवकुमार आग्रे व संजय कांबळे यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थितांशी संवाद साधला. संविधानिक मुल्यं शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात रूजवणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन विश्व पब्लिक स्कूलच्या संचालिका आम्रपाली येसगे यांनी तर प्रास्तविक कैलास येसगे कावळगावकर यांनी केले.