
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लाईटच्या डिपीवर चढून पोलवर जाऊन वायर जोडावे लागत आहेत.महावितरण वसुलीसाठी डिपीवरून कनेक्शन कट करून झेंपरींग तोडीत आहेत.बिल भरलेल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत.असल्यामुळे राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे हाळदेकर यांनी पोलवर चढून शेतकऱ्यांना लाईट जोडून देण्यासाठी ते स्वतः डिपीवर चढून लाईट जोडून दिली.त्यांच्या कामांसाठी राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.त्यांनी केल्येल्या कार्याबद्दल त्यांचें सर्वत्र कौतुक होत आहे.अशीच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे शेतकरी बांधवांनी म्हटले आहे.