
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनीधी -दिपक काकरा.
जव्हार:-तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली ग्रुप ग्रामपंचायत कासटवाडी हद्दीतील मौजे हाडे येथे नवीन नळपाणी योजनेचा नारळ ग्रामपंचायतीचे नवलोक निर्वाचित सरपंच कल्पेश राऊत यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला.सरपंच पदावर विराजमान होताच कल्पेश राऊत यांनी अनेक लोकोपयोगी कामांचा धडाका लावला असून प्रथम जनतेच्या प्राथमिक गरजा असलेल्या संबंधित कामांना प्राधान्य देऊन अनेक कामांची सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या सुरुवात करण्यात येणारी कामे ही लोकोपयोगी असल्याने नवनिर्वाचित सरपंच यांच्यावर जनतेकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील अनेक कामांचा समावेश आहे.हाडे येथील नवीन नळपाणी योजनेच्या शुभारंभा प्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती गुलाबताई राऊत,जव्हार पंचायत समितीचे मा.उपसभापती सिताराम पागी,मा.सदस्य विनायक राऊत,पंचायतीच्या उपसरपंच सुलोचना चौधरी,ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.