
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
▪️दि.पावर ऑफ मीडिया संघ व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व तालुक्यातील सर्व पत्रकारांनी दिले निवेदन
▪️तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी .
—————————————-
अमरावती :-पत्रकार प्रवीण बोके यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कापूस उद्योजक विवेक काकड वर कडक कार्यवाही करण्याबाबत दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी द पावर ऑफ मीडिया अंजनगाव सुर्जी व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ अंजनगाव सुर्जी तसेच तालुक्यातील सर्व पत्रकारांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन व त्यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाई करण्याची केली मागणी सविस्तर वृत्त असे की,कापूस उद्योजक विवेक काकड यांच्या घरासमोर गेल्या वीस पंचवीस दिवसापासून आंध्र प्रदेश येथील एक दांपत्य २०१८ पासूनचे त्यांच्या थकीत पैसे करिता बसले असल्याने त्यांना बरेच ये जा करणारे लोक विचारण्यात करत होते अशा बाबी बाबत पत्रकारांना जनतेकडून आलेल्या संदेशामुळे शहरातील काही पत्रकार येथे त्या दांपत्याचा विषय जाणून घेण्यासाठी गेले असता त्याच दिवशी पत्रकार संघटनेचे शहराध्यक्ष प्रवीण बोके यांना सायंकाळी याबाबत फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या वृत्तपत्रात त्यांची बाजू मांडत असतो अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर पत्रकारांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार अशा धमक्या देणाऱ्या वर कडक कारवाई करून त्यांना अटक करावी तसेच पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे अन्यथा तालुक्यातील सर्व पत्रकार व संघटना तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निवेदनामार्फत देण्यात आला आहे.