
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल- माणिक सुर्यवंशी
क्षिरसमुद्र येथे गावातील प्रत्येक घराला शुद्ध पीण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने जल जीवन मिशन योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर (जिल्हा अध्यक्ष भाजप नांदेड ), कैलास येसगे कावळगावकर (सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते) यांची विशेष उपस्थिती होती.
कैलास येसगे कावळगावकर यांनी गावातील लोकांनी जात, धर्म, पक्षभेद बाजूला सारत गावच्या विकासासाठी एकत्र यावे व गावात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लोकांनी विकास कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. समारोप करताना व्यंकटराव पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत या भागासाठी आवश्यक त्या योजना व निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासन दिले.
यावेळी राजशेखर पाटील, दीपक रेड्डी मरतोळीकर, क्षिरसमुद्र गावचे सरपंच सौ रुक्मिणी आनंद राजुरे, माजी सरपंच आनंदराव राजुरे, भीमराव शिरसागर शाखा आध्यक्ष, हनमंतराव नाईक (माजी सरपंच),
हनमंत राजुरे रोजगार सेवक, बालाजी पांचाळ (ग्रामपंचायत सदस्य,) बिरगोंडा खीरे, बाबाराव देशमुख, सूर्यकांत देशमुख,(तंटामुक्ती अध्यक्ष), माधवराव माली पाटील, दत्तात्रेय देवापुरे माजी उपसरपंच, बसवंतराव पोलीस पाटील, पंढरी डीकाजी ग्रामपंचायत सदस्य, विठ्ठल चन्नावार, बापूराव वाघमारे, रेवन पाटील, शेख जलील, संभाजी सूर्यवंशी नांदेड, अभियंता सर्वेश उमाटे , माणिक देशमुख, कांबळे ब्रम्हा मारोती पाटील, अंगत पांचाळ सेवक, गणेश पाटील ग्रामसेवक, चेतन नाईक, चंद्रकांत खिरे, सोपान भंडारे, मारोती पोलीस पाटील , महारुद्र अप्पा स्वामी चेअरमन, सुरेखा मनोहर भंडारे (ग्रामपंचायत सदस्य), सुलोचना (ग्रामपंचायत सदस्य),गौतम वाघमारे, विश्वनाथ राजुरे बासवाडा गुत्तेदार, व क्षिरसमुद्र येथील समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.