
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
सामाजिक बंधन पाळत सर्वस्वी समाजाला वाहून घेणारे दुसऱ्याच्या पिढा, वेदना आपल्या आहेत असे समजून घेणारे आणि भारताला समृद्ध राष्ट्र बनवायचे असेल तर इथला समाज शिकला पाहिजे, सीमेंटचे मोठमोठ्या ईमारती उभ्या करण्या पेक्षा सुसज्य अश्या शाळा उभारण्यावर विश्वास ठेवून अनेक अश्या सुसज्य शाळा उभ्या करणारे शिक्षण प्रेमी जेष्ठ समाज सेवक कृष्णा महाडिक साहेब यांनी असे प्रतिपादन केले की चांगला प्रगतशील भारत निर्माण करायचे असेल तर भाषा, जात, धर्म, या सारख्या गोष्टीना समाजात स्थान राहता कामा नेय आपण सर्व भारतीय आहोत हे महत्वाचे आहे आणि भारत प्रगत करायचा असेल तर शिक्षण महत्वाचा आहे दुसऱ्याच्या उणीवा काढण्या पेक्षा आपल्याला देशासाठी कायकरता येईल ते चांगले करावे. म्हसळा तालुक्यातील जिजामाता शिक्षण संस्था संचालित मराठी माध्यमिक शाळा वरवठने – आगरवाडा शाळा इमारतीचा भूमी पूजन सोहळा पारपडला या वेळी बोलताना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री महादेवराव पाटील साहेब संस्थापक तथा मा. प. स. सभापती म्हसळा, सचिव मा. अशोक काते,मा. कृष्णा कोबनाक संचालक, मा. मनोज नाकती संचालक मा. लक्ष्मण कांबळे संचालक, मा. दिलीप कांबळे, अड.मुकेश पाटील सल्लागार, सरपंच श्रीमती इशरत फकीह, उपसरपंच मा. जनार्दन गाणेकर, मा गोविंद भायदे, मा. नवनीत पारेख इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थितीत इमारतीचे भूमिपूजन सोहळा दानशूर मा.विजयजी नागरथ मा. कमलेश भाई मेहता, मा. सतीशजी पै. जेष्ठ अभिनेते मा बोमी दोतीवाला (मुन्नाभाई एम. बी. बी. एस ) यांच्या शुभ हस्ते पारपडले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. महादेवराव पाटील साहेब यांनी असे प्रतिपादन केले की समाजातील लोकांनी शिक्षणा साठी पुढे येऊन सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे शिक्षक हा भारतीय समाजाची एक पिढी घडवण्याचे काम करतो आणि तीच पिढी उद्या राष्ट्राचे नेतृत्व करते. ती पिढी भविष्य आहे. आणि ती पिढी घडावे म्हणून सतत झटणारे. हे पुण्य काम मा. कृष्णाजी महाडीक साहेब हे अश्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून करत आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ, उपस्थित होते कार्यक्रमासाठी शिक्षक वर्ग श्री नितीन म्हस्के, दिपक म्हात्रे, अंकुश गाणेकर, लक्ष्मण गाणेकर, श्री कांबळे, भाई तसेच शाळेचे विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप सुतार यांनी केले तर आभार मुख्याद्यापक मा. संदीप कांबळेकर यांनी केले