
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर :- समता ,स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धीगत करणारे भारताचे संविधान हे जगातील उत्कृष्ट व सर्वव्यापी असे संविधान आहे ., या संविधानामुळेच भारतात लोकशाही अबाधित राहिले आहे असे प्रतिपादन लाठ( खु) ता.कंधार येथील जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक गादेकर यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथांग परिश्रम करून लिहिलेले भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर १९४९रोजी संविधान सभेत त्यांनी सादर केले त्यामुळे हा २६ नोव्हेंबर हा दिवस राज्यभर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाचे परिपत्रक काढले आहे. लाठ ( खुर्द) तालुका कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक गादेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील घोरबांड, गावातील प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षक वृंद यांच्यासह अनेकांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या देशातील पददलित समाजातील नागरिकांना स्वाभिमान बहाल केला या देशातील प्रत्येक नागरिकांना मताचा अधिकार देऊन सर्वांना समितीच्या धाग्याने एकत्र बांधले डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाद्वारे या देशात रक्ताचा एक थेंब न साडता शांततेच्या मार्गाने सामाजिक क्रांती घडवून आणावी.असे प्रतिपादन केले.संविधान दिनानिमित्त घडी पत्रिकेतील माहीतीचे व संविधानाचे सामुदायिक वाचन केले.त्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने लेझीमच्या निनादात व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरील संविधान प्रति घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली.आणि लाठ ( खु.) ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत निबंध स्पर्धा घेऊन ७२ वा भारतीय संविधान हार्षउल्हासाने साजरा करण्यात आला.यावेळु विद्यार्थीनी समयोचित भाषणे केली.यावेळी विद्यार्थी, नागरिक, शिक्षक उपस्थित होते.