
दैनिक चालू वार्ता ता. प्रतिनिधी मुखेड -सुरेश जमदाडे
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग , सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर ” संविधान दिना ” च्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवानंद अडकिणे यांनी भारतीय संविधान संपूर्ण देशाला सन्मान मिळवून दिला आहे . जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रामध्ये भारतीय संविधानाची महत्त्वाची भूमिका आहे . समाजाला सामाजिक समता व न्याय देण्याचे कार्य संविधानाकडून मिळाले आहेत असे गौरवोद्गार काढले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . शिवानंद अडकिणे , प्रमुख पाहुणे मराठी विभाग प्रमुख प्रा.चंद्रकांत साखरे , प्रमुख वक्ते देगलूर महाविद्यालय , देगलूर चे प्रा.डॉ. रत्नाकर लक्षट्टे , राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. हरिदास भोईवार , प्रा.डॉ. संतोष शेंबाळे तर व्यासपीठावर हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. मधुकर राऊत हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राऊत सूत्रसंचालन डॉ. विजय वारकड , डॉ. मनिषा जोशी व आभार प्रदर्शन डॉ. गणंजय कहाळेकर यांनी मांडले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान वाचनाने कार्यक्रम सुरू झाला . संविधान वाचन डॉ. प्रसाद जोशी यांनी केले .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वीरभद्र शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळाच्या शुभेच्छा , महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग केक कापून , शाल , श्रीफळ व पुष्पहारानेअभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला . डॉ. लक्षट्टे , डॉ. भोईवार , डॉ. शेंबाळे या मान्यवरांच्या भाषणात भारतीय संस्कृती , संविधान , मार्गदर्शक सूचना , मूलभूत अधिकार व हक्क यांना अबाधित राखण्यासाठी प्रत्येक घटक परस्पर सहकार्य करावे . परस्परविरोधी कारवाया करून देश विघातक कृत्य टाळण्यासाठी अटोकाट प्रयत्न करावे . भारतीय संविधान व अस्मिता टिकवण्यासाठी स्त्री – पुरुष दोघांनी मिळून एकमेकांचे हीत जोपासले पाहिजेत असा मोलाचा सल्ला देण्यात आला . अध्यक्षीय समारोपाच्या प्रसंगी वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या सत्कार समारंभामुळे आभार मानले . भविष्यात एकजुटीने भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी सर्वतोपरीने मदत करण्याचे विचार मांडले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग , सांस्कृतिक विभाग , विद्यार्थी विकास विभाग यांनी प्रयत्न केले . यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थित होते .