
दैनिक चालू वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग व पुलांचे अर्धवट बांधकाम त्वरीत सुरवात करून पुर्ण करावे.याची दखल १ डिसेंबर पर्यंत घेतली नाहीतर १ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग अमरावती विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आ.बच्चु कडु यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रिय महामार्ग अमरावती यांना दिलेल्या निवेदनात दिला असून त्याची प्रत केंद्रिय रस्ते वाहतुक व बांधकाम मंत्री,जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक ग्रामीण यांना सादर केली आहे.
अचलपुर मतदार संघातील चांदूरबाजार ते बायपास रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट असून प्रलंबित आहे.चांदूरबाजार तालुक्यातील कुरळ पुर्णा येथील पुर्णा नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट पिलर उभारून प्रलंबित आहे.तोंडगाव मार्गावरील पिवळी नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट आहे.चांदूरबाजार शहरातील व शहरालगतचे महामार्ग व पुलाचे बांधकाम अर्धवट व प्रलंबित आहे.बहिरम यात्रा सुरु होण्याच्या मार्गावर असतांना तेथील मंजूर रस्त्याचे बांधकाम अद्यापही पुर्णत्वास गेले नाही.तळेगाव रस्त्यावरील संरक्षक भिंत व रस्त्याचे काम अर्धवट आहे.
चांदूरबाजार ते अचलपुर महामार्गावरील राष्ट्रीय महामार्गांचे
अर्धवट,अपुर्ण कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.या अर्धवट कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून पायी चालणाऱ्यासह वाहन चालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
चांदूरबाजार शहरातील राष्ट्रीय महामार्गांचे नेताजी चौक ते जयस्तंभ पर्यंत महामार्गाचे काम करण्यात आले.मात्र परतवाडा रोडवरील पुलापासून तर साई मंदिरापर्यंत अर्ध्या भागाचे काम करून काम बंद करण्यात आले.त्यामुळे उर्वरीत रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.यंदा पावसाळ्यात पुलाच्या अर्धवट कामाचा फटका पुलानजीकच्या वस्तीतील ४०० नागरिकांना बसला.या नागरिकांच्या संपुर्ण वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने घरातील अन्न धान्य,साहीत्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना नगरपरिषद शाळेत आश्रय घ्यावा लागला होता.त्यामुळे ही सर्व महामार्गाची अर्धवट व प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करावी याची दखल १ डिसेंबर पर्यंत घेतली नाही तर १ डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग अमरावती यांचे कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी राज्यमंत्री बच्चु कडु यांनी दिला आहे.