
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मंठा : ग्रामपंचायत म्हणजे गावचे मिनी मंत्रालय आहे. कोन्ही म्हणतंय भरा फारम आम्ही तुमच्या सोबत आहे अस एकूण ग्रामपंचायत लढवणाऱ्यांसाठी चार दिवसांची निवडणूक. पण, पाच वर्षे सर्व गावाकऱ्यांना भोगावे लागते. पैसे कमविणे हे डोक्यात ठेऊन निवडणुका लढविणार असाल तर ते अतिशय वाईट असून ते घातक आहे.काहींना वाटत माझ्याकडे पैसा आहे माणसं आहेत ते काही कामाच नाही ज्याच्याकडे वेळ कुवत, ज्ञान, शिक्षण योजनाची माहिती आपल्या गावचे काही तरी चांगले करायची ताकद आहे अशांनीच या क्षेत्रात यावं. हौशा गवश्यांनी या क्षेत्रात येऊन गावाचा नाश करु नये. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवानं आपण तशा व्यापक अर्थानं त्याच्याकडे पाहत नाही. असं सुरेश दवणे. (RTI ह्यूमन ऍक्टिव्हिष्ट अससोसिएशन मेडिया हेड जालणा) म्हणाले.