
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी शहरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून दुचाकी चोरी,घरफोडी तसेच वाटमारी यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आता तर चोरांनी स्मशानभूमीलाही आपले लक्ष केले आहे.अकोट रोडवर असलेल्या हिंदू स्मशान भूमीच्या कंपाऊंडला लावलेल्या लाखो रुपयांचे ग्रील चोरी गेल्याचे निदर्शनात आले आहे.नगरपरिषद अंजनगाव सुर्जी यांच्याकडे हिंदू स्मशान भूमीमध्ये लाखो रुपये खर्च करून सौंदर्यीकरण करण्यात आले.दोन्हीं बाजूने बंदिस्त असे वॉल कंपाऊंड घेण्यात आले परंतू या कंपाऊंडवर लावलेल्या ग्रीलच चोरांनी गायब केल्या तसेच मृतदेह जाळण्यात येत असलेल्या गृहावरील लोखंडी छत आता चोरांचे लक्ष असून नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहे.याबाबत सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेकदा नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे आरोप स्थानिक करीत आहेत.
*सन २०२१ ला न.प.प्रशासन यांना कळविण्यात आले होते.याकडे न.प.प्रशासन यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला हवे होते.परंतु हिंदू स्मशानच्या कंपाऊंडच्या ग्रील जातात तरी कोठे?मृतदेहावरचे लोणी खाणारा कोण?हे अद्याप सुद्धा स्पष्ट झाले नसून आतापर्यंत न.प.प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आले आहे,कारण गेल्या काळात हजारो रुपयांच्या चोरी गेलेल्या ग्रील संबंधित कोणत्याही चोराला पकडण्यात आले नसून यामधे प्रशासनाचाच हात तर नाही ना?असा सुद्धा प्रश्न नागरिकांना पडला आहे.*
श्रीकांत नाथे
प्रहार कार्यकर्ता,सुर्जी अंजनगाव