
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर उपजिल्हाधिकारी सोम्या शर्मा यांची नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या रिक्त पदावर केली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये देगलूर शहरातील अवैध धंद्यावर आळा बसवणारे एक दबंग उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांचा देगलूर शहर व परिसरामध्ये धबधबा बसला होता त्यांच्या या बदलीमुळे पुन्हा देगलूर शहरांमध्ये अवैध धंद्याचा बाजार मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता नाकारली जाणार नाही येणारा अधिकारी यांच्या नेतृत्वावर देगलूर शहराचे भविष्य अवलंबून असणार आहे सोम्या शर्मा यांना नितीन गद्रे
अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी पुढील आदेश दिले सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा. असे सोम्या शर्मा यांना आदेश देण्यात आले
जर देगलूर व देगलूर तालुक्याचा विकास खऱ्या अर्थाने होणार असेल तर या ठिकाणी असेच आय ए एस अधिकाऱ्याची गरज भासणार आहे.