
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका
कोरपना तालुक्यात कुसळ येथे दुल्लशहा बाबा दर्गाह मागील नाल्यावर पुलाचे बांधकाम करून पांदन रस्ता मंजूर करण्यात यावा अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते संकेत कुळमेथे यांनी केली.
कुसळ येथील दर्गाह मागील पांदन रस्त्याने शेतकरी – शेतमजूर ये जा करत असतात. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे हा पांदन रस्ता पूर्णपणे बंद होतो त्या मुळे दर्गाहा मागील नाल्यावर पुलाची निर्मिती करून पांदन रस्ता मंजूर करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
कुसळ ग्रामस्थांनी पूर्वीपासूनच या मागणीकडे शासन आणि प्रशासनाच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या मागणी कडे दुर्लक्ष केले. हा पांदन रस्ता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असल्यामुळे शासन आणि प्रशासन या मागणी कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते संकेत कुळमेथे यांनी केला.
नाल्यावर पुलीयाचे बांधकाम करून पांदन रस्ता मंजूर करावा अन्यथा गावकऱ्यांसह आंदोलन करण्याचा इशारा युवानेते संकेत कुळमेथे यांनी दिला.