
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजा बद्दल वादग्रस्त विधाना बाबतचा वाद चिघळत चालला असून त्या विरोधात मराठा क्रांती मोर्च्या व मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. महापुरुषांविषयी वादग्रस्त शब्द वापरून अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यपाल यांच्याकडून अनेकदा महापुरुषांविषयी चुकीचे वक्तव्य केले जात आहे. महापुरुषांच्या अपमान कदापीही सहन केला जाणार नाही. राज्यपाल तात्काळ हटवा या मागणीसाठी मंठा बदंचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा चे वतीने शासकीय विश्रामग्रह मंठा येथील बैठकीत करण्यात आले आहे तसेच
मराठा क्रांती मोर्चाच्या जालना जिल्ह्यातील समन्वयकांची महत्त्वाची बैठक मराठा सेवा संघ कार्यालयात शनिवार ता. २६ रोजी दुपारी ११वाजता घेण्यात आली. यावेळी जालना जिल्हा 7 डिसेंबरला बंदचा ठराव एकमताने पारीत करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाज महाराज, महात्मा ज्योतिबा फुले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषां बाबत वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जालना जिल्हा बंदच्या धर्तिवर 7 डिसेंबरला मंठा तालुका बंद ठेवण्या संदर्भात आज नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती,बंद यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रचार प्रसार करूण बंद यशस्वी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरले. छत्रपपती शिवाजी महाराज
यांच्या बाबतीत अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या
राज्यपाल कोश्यारीना हटवा महाराष्ट्र अस्मिता वाचवा..
छत्रपती शिवाजी महाराजांना
आदर्श मानणाऱ्या मंठा तालुक्यातील सर्व संस्था, संघटना,राजकीय पक्ष, नागरिकांना मराठा क्रांती
मोर्चाच्या वतीने सहकार्य करण्याचे आवाहन
करण्यात आले .