दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शिंदे गटात सामील झाल्यानंतर रिक्त झालेल्या ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास मोरे यांची निवड करण्यात आली असून नवनियुक्ती नंतर मोरे यांनी जव्हारला प्रमुख कार्यकर्त्यांची सदिच्छा भेटी घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.
जव्हारच्या शासकीय विश्रामगृह येथे जव्हार तालुका प्रमुख श्रावण खरपडे व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.या बैठकीदरम्यान बोलतांना मोरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असलेल्या सर्व शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना या संघर्षाच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.त्यामुळे न डगमगता काम करत रहा तसेच मोखाडा तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या लवकरच केल्या जातील हे ही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या बैठकीदरम्यान जव्हार तालुकाप्रमुख श्रावण खरपडे,विक्रमगड तालुकाप्रमुख संजय आगविले,पालघरचे उप तालुकाप्रमुख संजय तामोरे,जव्हार उप तालुकाप्रमुख इरफान शेख,अरशद कोतवाल,साईनाथ नवले,डॉ.विठ्ठल सदगीर,प्रकाश चुंबळे,रवी कालीटकर,राजन वैद्य,मोखाडा शहर प्रमुख निखिल लोखंडे,दिलीप मोहंडकर आदी. शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
