
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा येथील प्रतिष्ठित व्यापारी संजय पवार यांच्या मुलगी शिल्पा पवार ला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बायोइन्फाॅमॅटिस्कची पदवी बहाल करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम औरंगाबाद येथील एम.जि.एम विद्यापीठात झाला. यावेळी या कार्यक्रमाला पद्मविभूषण डॉ.श्री अनिलजी काकोडकर चेअरमन, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मेंबर ऑफ ऑटोमिक एनर्जी कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व आणि डॉ. शरदचंद्रजी पवार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मा.मंत्री कमलकिशोरजी कदम ,अंकुशरावजी कदम कुलपती एम.जि.एम विद्यापीठ औरंगाबाद यांच्या उपस्थितित शिल्पा पवार यांना ही पदवी बहाल करण्यात आली आहे.
शिल्पा पवार यांना ही पदवी मिळाल्याबद्दल माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे बोराडे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी सुधाकर, रवी भावसार,चव्हाण, संजय चव्हाण विनोद पवार व सर्व मित्र परिवाराकडून शुभेच्छा व कौतुक होत आहे.
यावेळी दैनिक चालू वार्ताशी बोलताना शिल्पा पवार म्हणाल्या की माझ्या या यशाची पूर्ण श्रेय माझ्या आई-वडिलांना जाते त्यांनी माझ्यासाठी खूप परिश्रम घेतले.